मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा येथील व वढोदा येथील अतिरिक्त भार असलेले ग्रामविकास अधिकारी यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जयपाल चिंचोरे असे निलंबीत अधिकार्याचे नाव आहे. नेमणुकी दरम्यान रजेवर असतांना ई निविदा प्रक्रिया राबविणे आणि चौकशीकामी कार्यालयाने मागणी करूनही दप्तर उपलब्ध न करणे या कारणवरून ग्रामविकास अधिकारी चिंचोरे यांना निलंबीत करण्यात आले असून नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना याबाबत आदेश दिले होते.
चौकशीनंतर ग्रामविकास अधिकारी दोषी असल्याचा ठपका
वढोदा येथील ग्रामपंचायत सदस्य आशिष सुभाष पाटील यांच्यासह सात सदस्यांनी 27 एप्रिल 2021 रोजी तक्रारी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने झालेल्या खातेनिहाय चौकशी नंतर वढोदा ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांनी ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाचे दप्तर चौकशी कार्यालयाने मागणी करूनही उपलब्ध न केल्याने व रजेवर असतानाही ई निविदा प्रक्रिया राबविली तसेच बयाणा रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात ऑनलाईन न स्वीकारता नमुना क्रमांक 7 च्या पावती रोखीने स्वीकारणे आदी बाबींमध्ये प्रशासकीयदृष्ट्या गैरवर्तन केल्याचे दिसून आल्यानंतर गुरुवार. 24 रोजी गटविकास अधिकारी नागतिळक यांनी ग्रामविकास अधिकारी चिंचोरे यांनी निलंबीत केले आहे.