जळगाव – महाशिवरात्रीनिमित्त जळगावातील सर्व शिवमंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती तब्बल २ वर्षांनी खऱ्या अर्थाने जळगाव शहरात शिवरात्री साजरी करण्यात आली. यावेळी रंगरंगोटी करून मंदिरांना नवी झळाळी देण्यात आली होती. शहरातील विविध मंदिरांमध्ये मंगळवारी दिवसभर अभिषेक, पूजा-पाठ मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. शहरातील शिवमंदिरांना जत्रेचे स्वरूप आले होते.
महाशिवरात्रीनिमित्त जळगावातील सर्व शिवमंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली, रंगरंगोटी करून मंदिरांना नवी झळाळी देण्यात आली, शहरातील विविध मंदिरांमध्ये दिवसभर अभिषेक, पूजा-पाठ कारण्यात आले. त्यामुळे शहराला आज यात्रेचे स्वरुप प्राप्त होणार आहे.
‘शिव शंभो हर हर शंभो… भवनाशा कैलास निवासा… पार्वतीपते हरे पशुपते… गंगाधरा शिव गौरीपते’ अशा शिवनामाच्या गजरात शहर दुमदुमन गेले. शिवालयांच्या परिसरात बेलपाने, पूजेच्या साहित्याची दुकाने थाटलेली आहेत. बाजरपेठेतही रताळे, फळे याचबरोबरोबर उपवासाच्या पदार्थांनी बाजारपेठ गजबजली आहे. महाशिवरात्रीला एकूणच जळगाव शहरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
जळगावात अनेक लहान मोठी शिवाची मंदिरे आहेत. त्यातील ओंकारेश्वर मंदिर, गोलाणी मार्केट जवळील शिवमंदिर, ओमशांती नगरातील शिवमंदिर, शिवधाम अशा प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधत हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर परिसरात स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करून शिस्तीत दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
त्रेचाळीस वर्षे जुने ओंकारेश्वर मंदिर
जयनगर परिसरात १९७१मध्ये उभारण्यात आलेले ओंकारेश्वर मंदिर हे शहरातील सर्वात जुने मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे चार वाजेपासून ते शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत असा एकूण सात वेळेस अभिषेक करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये भजनाचे कार्यक्रम देखील होणार आहेत. भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिवसभर दूध, साबुदाण्याची खिचडी, उपवासाच्या पदार्थांचे वाटप होणार आहे.
१००८ शिवलिंगावर अभिषेक
‘गो मातेची काय वर्णावी महती, तेहतीस कोटी देव असे तिच्या देहात, गोमय शिवलिंग पूजन करिती, तया मनोकामना पूर्ण होतील’ अशा शब्दांत गोमातेची महती वर्णन केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त पांझरापोळ गोशाळेत सकाळी नऊ वाजेपासून एक हजार आठ शिवलिंगावर अभिषेक करण्यात येणार आहे. या अभिषेकासाठी गायीचे शेण, नर्मदेची रेती, पाच नद्यांचे पाणी, समुद्रातील रेती, तुळशी, बेल, शमीच्या झाडांखालची माती, तसेच बेलपत्रांचे चूर्ण यासर्वाचे पंचामृत, पंचद्रव्ये, पंचग्रव्य, गुलाबजल, अत्तराचे मिश्रण करून एक हजार आठ शिवलिंग तयार करण्यात आले आहेत. या शिवलिंगांवर सोळाशे जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे.
शिवधाम मंदिरात छप्पन्नभोग
निमखेडी शिवारातील हरिशंकर पुरनचंद अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवधाम मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक, छपन्नभोग, भजनसंध्या यांसारखे कार्यक्रम घेणयात आले. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर रोषणाई करण्यात आली. रांगोळयांनी मंदिर परिसर सजविण्यात आला आहे. शिवधाम मंदिर हे सकाळी ४ वाजेपासून रात्रभर खुले होते.
बालाजी देवस्थानचा रथ
महाशिवरात्रीच्या दिवशी २५ वर्षांपेक्षा जुन्या बालाजी मंदिरापासून व्यंकटेश मंदिरापर्यंत वाजत गाजत रथ काढण्यात येतो. फुलांच्या माळांनी सजविलेल्या रथाचे भाविक भजन, टिपऱ्यांच्या तालात स्वागत करतात. आज सकाळी हा रथ निघणार असून, रात्री नऊ वाजता तो व्यंकटेश मंदिरात पोहचून समाप्ती होणार आहे. रथाच्या मार्गात तसेच मंदिर देवस्थानात सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत पेढे, साबुदाण्याची खिचडीचे प्रसादरुपी वाटप होणार आहे.
ओम शिवशंकर मंदिर
शांतीनगरातील ओम शिवशंकर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पहाटे ४ वाजेपासून पुजेला प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता ध्वजवंदना करण्यात येणार अली. दुपारी ११ वाजता महाआरती होणार आहे. दुपारी ११ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.