भरारी फौंडेशन तर्फे राज्यपालांना निवेदन

जळगाव – जिल्हातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे परिवाराला सक्षम करणे व शेतकरी आत्महत्या थांबवणे या विषयावर भरारी फाउंडेशन काम करत असल्याची माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आली. शेतकरी आत्महत्या कशा थांबवता येतील व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन मा.राज्यपाल यांना देण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. रंजनाताई पाटील विधान परिषद आमदार मा.चंदूभाई पटेल जळगाव शहराचे विधानसभा आमदार मा.राजुमामा भोळे व माजी आमदार मा. स्मिताताई वाघ उपस्थित होत्या.