दोधे गावात 28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग

रावेर : घरात एकटी असलेल्या 28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना रावेर तालुक्यातील दोधे येथे घडली. रावेर तालुक्यातील दोधे गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय विवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून संशयीत आरोपी सचिन मुरुमकर याने पाणी पिण्याच्या बहाण्याने विवाहितेचा विनयभंग केला. या प्रकरणी आरोपीविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास फौजदार सचिन नवले करीत आहेत.