हिरापूरला बनावट मद्य कारखाना उद्ध्वस्त : तिघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ः आठ लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात

चाळीसगाव : राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने हिरापूर येथील बनावट देशी-विदेशी दारूि नर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करीत तिघांना अटक केली. बनावट दारु व वाहनासह 8 लाख 49 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बनावट मद्य पकडल्यानंतर ‘हिरापूर कनेक्शन’ उघड
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनात 26 रोजी चांदवड ते नाशिक रोडवर, महिंद्रा पिकअप क्र. एम.एच.41.ए. जी.0816 हे वाहन पकडले. या वाहनात बनावट देशी-विदेशी मद्याची शिवम अनिल महाजन व राजेश वनाजी सोळसे हे वाहतूक करीत असल्याचे उघड झाले.

हिरापूरात पथकाची कारवाई
शुभम महाजन हा चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी असून तो घरी बनावट दारू तयार करत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, विविध ब्रॅण्डचे बुच 4500 नग, देशी दारू टॅँगो पंचचे 1000 लेबल्स, बाटली सील करण्याचे यंत्र, मद्यार्क 340 लीटर, बनावट देशी दारू 276.48 लीटर व विदेशी दारू 95.04 लीटर, असा वाहनासह 8 लाख 49 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभागाचे निरीक्षक ए. एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम.पाटील, ए. जी. सराफ, निरीक्षक एम.एन.कावळे, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांनी ही कारवाई केली. चाळीसगाव विभागाचे निरीक्षक के.डी. पाटील यांनी मदत केली. तपास निरीक्षक ए. एस.चव्हाण करत आहेत.