महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून अधिवेशनाचा पहिला दिवस अत्यंत वादळी ठरला. तर दुसऱ्या दिवशीही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात ओबीसी आरक्षणावरून टोलेबाजी सुरु झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी नेत्यांचे अक्षरशः कपडे फाडले. दरम्यान, या प्रकरणात चिखलफेक करून काही मिळणार नाही, यासाठी राजकारण न करता एकमेकांना साथ देत तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
यावेळी भुजबळ म्हणालेकी. ओबीसीच्या पाठिमागे आपण उभे आहात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळेच ओबीसींना वाचवा अशी टोपी मी घातली आहे. आमच्याकडे जे काही उपलब्ध होतं ते आम्ही १५ दिवसांत दिल्या. तुम्ही ७ वर्षांत ओबीसी आरक्षण का वाचवलं नाही? विकास गवळी कोणामुळं उभे राहतात? असं म्हणत छगन भुजबळ आक्रमक झाले. एकमेकांची उणी-धुणी काढण्यापेक्षा आपण चर्चा करू, असंही छगन भुजबळ म्हणाले.