विद्यापीठात शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारत सरकार द्वारा प्रायोजित राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या समुदायासाठी जैवमात्रा परावर्तन, शाश्वत शेती, हरित ऊर्जा आणि जैवतंत्राधारित अर्थव्यवस्था या विषयांवर चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ६० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

          दि.९ ते १२ मार्च दरम्यान हरणखुरी व दि.२३ ते २६ मार्च दरम्यान राणिपूर जि.नंदूरबार येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे प्रा.डॉ.नवीन दंदी, प्रा.डॉ.ए.बी.चौधरी, प्रा.डॉ. भूषण चौधरी व प्रशाळेचे संचालक प्रा. अरूण इंगळे हे गेल्या दोन वर्षांपासून नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या युवक आणि शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती, सेंद्रिय खते, जैवमात्रा परावर्तन, शाश्वत शेती, जैवतंत्राधारित शेती आणि त्यामागील अर्थव्यवस्था या विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.