आयजींच्या पथकाने रोखली केमिकल हेराफेरी : नेरमध्ये पावणेदोन कोटींच्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात, पाच पसार
धुळे : तालुक्यातील नेर गावाजवळील हॉटेल वीर चैतन्यमागे केमिकलचा काळा बाजार करणार्या रॅकेटचा नाशिक आयजींच्या विशेष पथकासह स्थानिक पोलिसांनी शुक्रवार, 4 रोजी पर्दाफाश करीत सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य पाच संशयीत पसार झाले आहेत. पोलिसांनी केमिकलचे दोन ट्रक जप्त केले आहेत.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी अनिलकुमार चव्हाण (बडोदा, गुजरात) व अफजल बेग नियाज बेग मिर्झा (रा.नेर, ता.धुळे) यांना अटक करण्यात आली तर संजय बैसाणे, गणेश जैस्वाल (रा.नेर, ता.धुळे), लवलेस जाट (रा.नेर, ता.धुळे), चालक घेवाराम प्रेमाराम (रा.राजस्थान) व चालक मनाराम हासुराम (राजस्थान) पसार झाले असून सातही संशयीतांविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई आयजींच्या विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाने, सचिन धारणकर, कुणाल मराठे, धुळे तालुक्याचे उपनिरीक्षक काळे, कॉन्स्टेबल सुमित चव्हाण, नेर औट पोस्टचे ज्ञानेश्वर गिरासे आदींच्या पथकाने केली.