जळगाव :-खान्देश हा विविध लोक साहित्य आणि परंपरेनी नटलेला प्रदेश आहे खान्देशातील वहीगायन, सोंग, कानबाई गिते, गोठ, सोगाड्या पार्टी, भगत भोपे आदि लोककला ह्या परंपरेन चालत आलेल्या व खान्देशातील सण, उत्सव व मौखिक साहित्यातुन निर्माण झालेल्या अस्सल लोककला आहे…
खान्देशातील विविध लोककले च्या जतन व संवर्धना सोबतच ह्या लोककलां ची माहिती नव्या पिढीला मिळाली तसेच काळाच्या ओघात नामशेष होणा-या या कलेला नव संजीवन मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने खान्देशात प्रथमच या महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे
या महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजंननाताई पाटील व जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय औरंगाबाद लेखा अधिकारी सुदर्शन ढगे शैलाताई चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक विनोद ढगे यांनी केले तर महोत्सवाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत लेखाधिकारी श्री सुदर्शन ढगे यांनी केल..
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुजोबा वहीमंडळ वाघोड ता रावेर जि जळगाव ,साईशक्ती वहीमंडळ नगरदेवळा ता पाचोरा जि जळगाव व पंचरगी वही मंडळ नांदगाव ता जि जळगाव यांनी वहीगायनाचा कार्यक्रम सादर केला
दि 4 मार्च ते 6 मार्च तिन दिवस चालणा-या या महोत्सवाचे आयोजन जळगाव च्या नवीन बस स्थानका शेजारील ऍम्पीथिएटर, राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधी उद्यान या महोत्सवाचे आयोजन रोज सांयकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात आले असुन येणा-या दोन्ही दिवस जळगावकरानी या महोत्सवात हजेरी लावुन आपल्या खान्देशी लोककलेच्या सादरीकरणाचा आनंद घ्यावा व आपल्या लोककलावंचा उत्साह वाढवावा असे अवाहन रजंनाताई पाटील व महापौर जयश्रीताई महाजन यांनी जळगावकरांना केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपुर्वा वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेशजी अमृतकर यांनी मांडले
भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतुन व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन होत आहे…
खान्देशातील लोककलावंना शासनस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, खान्देशातील पारंपारीक लोककलेच्या सन्मान व्हावा या लोककलेत कार्यरत कार्य करणा-या लोककलावंताचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
या महोत्सवात खान्देशातील व मराठवाडा भागातील नऊ वहीगायन मंडळे सहभागी झाले असुन . वहीगायन या लोककलेच्या सादरीकरणाने तिन दिवस हा महोत्सव रंगणार आहे
खान्देशात प्रथमच होत असलेल्या या महोत्सवात खान्देशातील लोककलेच्या संवर्धनासाठी या लोकलेला सन्मान मिळावा यासाठी तसेच ग्रामीण भागातील लोककलावंताचा कला अविष्कार पहाण्यासाठी जळगावच्या कला रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे