डॉ विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी विद्यापीठाचे नवे कुलगुरू

जळगाव  – कवीय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  डॉ विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची निवड करण्यात आली आहे. ते विद्यापीठाचे सातवे कुलगुरू ठरले आहेत.  जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख म्हणून डॉ विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांनी काम पहिले आहे. त्याची  कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.