जळगावातील प्रौढाला 58 हजारांचा गंडा

जळगाव : क्रेडिट कार्डची रक्कम वाढवून देण्याची बतावणी करून एका भामट्याने प्रौढाच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यातून 58 हजार 759 रुपये परस्पर वळवल्याचा प्रकार समोर आला आहेे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
राजेंद्र नामदेव पाटील (47, रा. सुकृती पिनॅकल अपार्टमेंट) यांच्याकडे आरबीएल व एसबीआय अशा दोन बँकांचे क्रेडिट कार्ड आहे. 5 मार्च रोजी दुपारी दोन वाजता पाटील यांना दोन अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आले. या क्रमांकावरून बोलणार्‍या भामट्याने त्यांना क्रेडिट कार्डची रक्कम वाढवून देण्याची बतावणी केली. भामट्याने सांगितल्याप्रमाणे पाटील यांनी सुरुवातीला क्रेडिट कार्डचे नंबर दिले. यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी दिला. यानंतर त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून 58 हजार 759 रुपये परस्पर वळते केल्याचे मेसेज मिळाले. पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.