भुसावळ : गांधीधाम-विशाखापट्टनम एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेला प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लांबवला. ही घटना सोममारी रात्री घडली. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो नंदुरबार लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.
प्लॉट खरेदीचे स्वप्न अपूर्ण
अहमदाबाद-बडनेरा प्रवास करीत असलेले प्रवासी पवनकुमार गोवर्धन व्यास (रा.अमरावती) हे गांधीधाम-विशाखा पटनम एक्स्प्रेसच्या एस-4 या डब्यातील 72 नंबरच्या सीटवर बसून प्रवास करीत असताना सोमवारी पहाटे झोपी गेल्यानंतर चेारट्यांनी बॅग लांबवली. त्यात प्लॉट खरेदीसाठीचे साडेचार लाख रुपये, 50 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, एक हजारांचा हेअर डाय मिळून पाच लाख तीन हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज होता. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी गाडीतच तक्रार नोंदवली गुन्ह्याचे कार्यक्षेत्र नंदुरबार असल्याने नंदुरबार लोहमार्ग पोलिसात गुन्हा वर्ग करण्यात आला.