लखनऊ –
उत्तर प्रदेश विधानसभेचे निकाल लागायला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेश मध्ये भाजपाने मोठ्या फरकाने मुसंडी मारली आहे. भाजपा आणि सपामध्ये आता तब्बल १०० जागांचा फरक दिसू लागला आहे.आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये 305 जागांचे कल हाती लागले असून ज्यामध्ये भाजप 200 तर सपा 100 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये काँग्रेसला दोन तर बसपाला तीन जागा आघाडीवर आहेत.यामुळे मोदी योगी के जोडीने करके दिखाया हेच म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ४०३ आमदार आहेत. सध्या ३७८ जागांचे कल हाती आले आहेत. पैकी २४६ मतदारसंघांत भाजप आघाडीवर आहेत. तर समाजवादी पक्ष १२० जागांवर पुढे आहे. उत्तर प्रदेशात गेल्या ३ दशकांत कोणत्याच पक्षाला सत्ता राखता आलेली नाही. मात्र भाजपनं इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
गोवा, मणिपूर, उत्तराखंडातही भाजपनं आघाडी घेतली आहे. सध्या या तिन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. आता हाती येत असलेले निकालाचे कल पाहता तिन्ही राज्यांत भाजप सत्तेत कायम राहिलं असं दिसत आहे. उत्तराखंड आणि गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये सुरुवातीला जोरदार लढत दिसत होती. मात्र आता दोन्ही राज्यांत भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे.