‘कुणावर प्रेम करावे, महिला ठरवणार’

0

नवी दिल्ली । महिलेला एखाद्यावर प्रेम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. त्यांची स्वत:ची आवड असते. कुणावर प्रेम करावे किंवा करू नये, याचे तिला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 वर्षांच्या मुलीची छेड काढून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली.

महिलांवर वाढत्या गुन्ह्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने सवाल केला की, या देशात महिलांना शांततेत का जगू देण्यात येत नाही? आरोपीच्या वकिलांनी तरुणीच्या मृत्यूपूर्व जबाबावर संशय केला होता तसेच म्हटले होते की, वैद्यकीय चाचणीनुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती बोलण्यास वा लिहिण्यास असमर्थ होती. त्यावर कोर्ट म्हणाले, तुम्ही तिच्यावर अशी परिस्थिती आणली की ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली. हिमाचल प्रदेश हायकोर्टाच्या निकालाला आव्हान देणार्‍या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.