वृद्धांना लुटणारा भामटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी, शनीपेठ व फैजपूर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांचा उलगडा

जळगाव : वयोवृद्धांशी सलगी साधून त्यांना वाहनावर बसवून त्यांना लुटणार्‍या भामट्याच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एमआयडीसी हद्दीतील दोन तसेच शनीपेठ व फैजपूर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्याचा उलगडा या माध्यमातून करण्यात यंत्रणेला यश आले आहे. इब्राहीम उर्फ टिपु सत्तार मन्यार (30, रा.बाहेरपुरा वराडसीम, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जळगाव अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग शिकारे, एएसआय आनंदसिंग धर्मा पाटील, अतुल वंजारी. हवालदार मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, चंद्राकांत पाटील, नैत्रममधील मुबारक देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.