जळगाव : जळगाव तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात वॉश आऊट मोहिम राबवण्यात सुरुवात केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. दोन भट्ट्यांवर कारवाई करीत पोलिसांनी सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.
दापोरा शिवारात सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील दापोरा शिवारात अरुण गोबा सोनवणे हा गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी लावून चुलीवर दारू गाळताना आढळल्याने त्यास ताब्यात घेण्यात आली तर गूळ मोह, नवसागरमिश्रीत कच्च्या व पक्क्या रसायनाचे भरलेल्या 11 ड्रममधील दोन हजार शंभर लिटर रसायन नष्ट करण्यात आले तसेच शंभर लिटर हातभट्टीची दारू मिळून 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई जिभाऊ वसंत गायकवाड याच्याविरोधात करण्यात आली. संशयीत दापोरा येथे जळत्या चुलीवर हाथ भट्टीची दारू गाळत असतानाच पोलिसांनी धाड टाकली. गूळ मोह नवसागर मिश्रित कच्चे पक्के मिळून 920 लिटर रसायन नष्ट करण्यात आली तर शंभर लिटर दारूसह 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, हवालदार हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, नाना मोरे, संजय भालेराव, अभिषेक पाटील, उमेश ठाकूर आदींच्या पथकाने केली.