जळगाव : जळगाव टोलनाक्याच्या बाजूला शिवशाही हॉटेलजवळ कपाशीच्या गोडाऊनला शनिवारी सायंकाळी सहा सव्वा सहाच्या सुमारास भीषण आग लागली. महानगरपालिकेचे एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून या आगीमुळे लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
अचानक लागली आग
कुसुंबा शिवारात जळगाव टोलनाक्याजवळील गोडावूनला शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले. तर त्यानंतर पुन्हा चार वेळा आलेल्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. कापसाच्या गोदामाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती आहे.