जळगाव : जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात अवैध धंदे चालकांविरोधात मोहिम उघडण्यात आल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गावठीसह अवै धंदे चालकांविरोधात कारवाई
महामार्गालगतच्या राधिक हॉटेलमागे प्रकाश पितांबर पाटील (पिंप्राळा) व सोपान देविदास पाटील (संत मिराबाई नगर, जळगाव) यांच्याकडून दोन हजार 610 रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली तर दीपक गुलचंद जगताप (रोहनवाडी) याच्या ताब्यातून दोन हजार 250 रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली तसेच किशोर सोमा मालचे (आमोदे) यांच्या कब्जातून 600 रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. संशयीत भीमा एकनाथ नाईक (दापोरा) याच्या ताब्यातून 690 लिटर कच्चे रसायन नश्ट करण्यात आले तसेच 31 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच धनराज फुलसिंग पवार (नाईक) (दापोरा) याच्या ताब्यातून 570 लिटर रसायन नष्ट करण्यात आले व 27 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. संशयीतांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
अवैध धंद्यांवरही धाडसत्र
महेश शिवदास ननवरे (ममुराबाद, जळगाव) याच्याकडून एक हजार 150 रुपयांच्या रोकडसह सट्टा-जुगाराची साधने, गणेश जयराम सोनवणे व भिकन सीताराम सोनवणे (नांद्रा, जि.जळगाव) यांच्याकडून दोन लाख 65 हजार रुपयांच्या रोकडसह व सट्टा जुगाराची साधने व विकास अंकुश पाटील (नेरी नाका, जळगाव) याच्याकडून 240 रुपयांच्या रोकडसह सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोहनस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, हवालदार हरीलाल पाटील, साहेबराव पाटील, ईश्वर लोखंडे, विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, अभिषेक पाटील आदींच्या पथकाने केली.