बोदवड : शाळकरी विद्यार्थिनींचा सातत्याने पाठलाग करून त्यांना मनस्ताप देणार्या रोडरोमिओला संतप्त विद्यार्थिनींनी एकी करीत चांगलेच बदडून काढले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. बोदवड तालुक्यातील बेटावद खुर्दच्या या संशयीताला अधिक कारवाईसाठी बोदवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, रोडरोमिओचा हा व्हिडिओ सोशल मिडीयातून तुफान व्हायरल झाला असून विद्यार्थिनींच्या हिंमतीचे कौतुक होत आहे.
संतप्त विद्यार्थिनींनी चपलांनी ‘धो धो धुतले’
बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी बसेस बंद असल्याने दररोज दोन किलोमीटर पायपीट करीत जामठी येथे येतात मात्र विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओ असलेला तरुण हा सातत्याने त्रास देत असल्याने विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या. त्रस्त विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली तसेच घडलेला प्रकार घरी पालकांनाही सांगितला. त्यानुसार पालकांनी संताप व्यक्त करीत मंगळवारी ठरवून सापळा रचला. मंगळवार, 15 सकाळी 6.45 वाजता विद्यार्थिनी शाळेसाठी निघाल्यानंतर रोडरोमिओ पुन्हा समोर आला व याचवेळी पालकांनीच त्यास पकडले. यावेळी संशयीतास मुलींनी ‘चपला-चपलांनी’ मारहाण करीत जन्माची अद्दल घडवली. यानंतर पालकांनी संबंधितास बोदवड पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याच्याविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
https://fb.watch/bMdKoBu8wE/