शिवचरित्र फाऊंडेशनची कार्यकारिणी जाहीर

0

जळगाव । पिंपळकोठा बु. या ठिकाणी शिवचरित्र फाऊंडेशन, पिंपळकोठा बु. या नावाची संस्था, पिंपळकोठा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेला म. सहाय्यक धर्मदाय आयुक्त जळगाव यांचेकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून पिंपळकोठा बुाा. परिसरात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

सदस्यांची निवड याप्रमाणे
सचिन पाटील (अध्यक्ष), गणेश पाटील (उपाध्यक्ष), ज्ञानेश्‍वर पाटील (खजिनदार), रविंद्र पाटील (सचिव), महेंद्र पाटील (सहसचिव), तर ज्ञानेश्‍वर पाटील, समाधान पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील, सुलोचना देसले, मनिषा पाटील यांची सभासद पदी निवड करण्यात आली आहे. परिसरातील जनतेने संस्थेची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नवनिर्वार्चित कार्यकारी मंडळाचे अभिनंदन भाजपा तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, प्रविण पाटील, सरपंच काशिनाथ राजपुत, पोलीस पाटील रविंद्र पाटील यांनी अभिनंदन केले आहे.