मुंबई – जलसमृद्धी सप्ताह ला सुरवात झाली आहे या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विकास मंच ने राबवलेल्या जलसमृद्धी अभियान या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे यांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.
जलसमृद्धी अभियांना अंतर्गत तालुक्यातील खेडगाव-खेडी, दसकेबर्डी, बहाळ आणि पोहरे करमूड ही गाव दुष्काळातून बागायती कडे वळली आहेत. तसच चाळीसगाव विकास मंच ने आरोग्य , सिंचन, कृषी , शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात भरीव काम सुरू केलं आहे. या सर्व कामाची माहिती राज्यपाल महोदय यांनी जाणून घेतली.