मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पिंपरीअकराऊत गावाजवळ मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात झायलो गाडी पलटी होऊन संजय सुपडू वाघ (49, चिंचखेडा बुद्रुक) यांचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. हा अपघात गुरुवार, टना 17 मार्च रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी प्रमोद सुपडू वाघ (45, चिंचखेडा बुद्रुक) यांच्या फिर्यादीनुसार चालक श्रीकृष्ण केशव गावंडे (चिंचखेडा बुद्रुक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका प्रवाशाचा जागीच मृत्यू
या अपघातात श्रीकृष्ण केशवराव गावंडे, प्रताप भाऊराव गावंडे, श्रीराम सीताराम धायडे, उमराव उमाकांत गावंडे, नितीन उमाकांत गावंडे, दिनकर जगन्नाथ देशमुख (सर्व राहणार चिंचखेडा बुद्रुक) हे गंभीर जखमी आहेत. भरधाव झायलो (एम.एच.19 एक्स 3825) दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात डिव्हायरला धडकल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.