जळगाव – शहर महानगरपालिकेची ऑफलाईन महासभा गुरुवारी पार पडली. यावेळी सुरुवातिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या नंतर भाजप वि शिवसेना अशी खडाजंगी पाहायला मिळाली. नितीनभाऊ आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला मात्र आमच्या म्हणण्याला तुम्ही मान ना देता गेल्या महासभेत घनकचरा प्रकल्पाचा ठराव पारित केलात असा आरोप भाजपा नगरसेविका शुचिता हाडा यांनी शिवसेना नगरसेवक नितीन लड्ढा यांच्यावर केला.
जळगाव शहर मनपाचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी महासभेत सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय सभा दि.३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महासभेला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी व्यासपीठावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मागील महासभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यावरून भाजप-शिवसेनेत वाद निर्माण झाला. गेल्या महासभेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील वाढीव कामांच्या संदर्भातील तो विषय होता. भाजप आक्रमक होत असल्याने विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी चक्क घनकचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. तसेच लागलीच सभागृह नेते ललित कोल्हे यांनी कचरा संकलनच्या मक्तेदाराची देखील नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.
महासभेच्या सुरुवातीलाच मागील महासभेचे इतिवृत्त कायम करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी भाजपकडून जोरदार विरोध नोंदवण्यात आला. नागरविका ऍड.शुचिता हाडा यांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवित गेल्या महासभेत भाजपकडून मी भाजपा तर्फे विरोध नोंदवला होता असे म्हणाल्या. यावेळी त्या मानल्या कि, माझा विरोध हा भाजपतर्फे होता असे इतिवृत्तात उल्लेख आहे. परंतु ठराव मंजूर करताना ते घेण्यात आलेले नाही. यामुळे महापालिकेत बेकायदेशीर कामकाज होत असून लोकशाहीची हत्त्या केली जात आहे असावं आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यावर आम्ही मागच्या महासभेत आम्ही वैष्णवीस ठेवला मात्र त्यांनी आमच मत नोंदवून घेतल नाही. असा अरब त्यांनी केला. उत्तर देत नितीन लड्ढा म्हणाले कि, केवळ आपला विरोध नोंदविण्यात आला होता तो संपूर्ण भाजपचा नव्हता असे सांगितले. कारण भाजप म्हणजे हाडा नाहीत आणि शिवसेना म्हणजे मी नाही. तसेच या ठरावाविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकतात. शासनाकडे ठराव विखंडनासाठी पाठवू शकतात ते पर्याय आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावर हाडा यांनी उत्तर दिले कि, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहेत. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करणारच मात्र गेल्या महासभेत जे झाले ते चुकीचे झाले आहे असे हाडा म्हणाल्या.
त्यानंतर नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी, आपल्या महापालिकेत सर्व विषय सामंजस्याने मान्य केले जातात. त्यात कुठेही भेदभाव होत नाही. जळगावकरांच्या हितासाठी जे योग्य आहे ते योग्य पद्धतीने व्हायला हवे. काही विषय पक्षाच्या बैठकीत ठरतात आणि त्यावर एक सदस्य आपले मत मांडत असतो त्यामुळे नवीन पायंडा पाडू नये. असे असल्यास प्रत्येक विषयावर मतदान घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक कैलास सोनवणे, ऍड.शुचिता हाडा, दीपमाला काळे यांच्यासह भाजप नगरसेविका आक्रमक झाल्या. गेल्या महासभेत मांडण्यात आलेले मुद्दे आणि शब्द सर्व ऍड.शुचिता हाडा यांनी वाचून दाखविले.
दोन्ही पक्षांकडून जोरदार वादविवाद झाल्यावर १८ कोटींचे काम घेणारा तो माणूस कोण हे एकदा तरी पाहू द्या. काळा का गोरा, कसा आहे ते समजू द्या असा टोला नगरसेवक कैलास सोनवणे यांनी लगावला. घनकचरा प्रकल्पाच्या वाढीव कामावरून होत असलेल्या गोंधळात ते काम घेणाऱ्या मक्तेदाराची नार्को टेस्ट करा म्हणजे तो कोणाला भेटला, कुठे गेला, काय बोलला हे सर्व सत्य समोर येईल अशी मागणी शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केली. महाजनांच्या मागणीनंतर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी आक्रमक होत गेल्यावेळी मोठा ठेका घेणाऱ्या मक्तेदाराची देखील नार्कोटेस्ट करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी अमृत योजना, कचरा संकलन, घनकचरा प्रकल्पाच्या मक्तेदाराची देखील नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली.