चाळीसगाव तालुक्यातील तरुणाची चिमुरड्यांसह आत्महत्या : पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : कौटूंबिक वादातून नगरदेवळा रेल्वे स्थानकावर चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा (लेीज्ञहशवर) येथील 27 वर्षीय युवकाने दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केली. रविवार, 13 फेब्रुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत जितेंद्र दिलीप जाधव (27, बोरखेडा, ता.चाळीसगाव) यां तरुणासह चिराग (वय 6) व खुशी (वय 4) या चिमुकल्यांचा मृत्यू ओढवला होता. या घटनेप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसह वास्तव्यास होता. चाळीसगावातील एका मक्तेदाराकडे तो जेसीबी चालक म्हणून कार्यरत होता मात्र जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पुजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याने त्याच्याविरोधात नुकतीच चाळीसगाव पोलिसात पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेल्या. रविवार, 13 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेत रविवारी सकाळी 11 वाजता सचखंड एक्सप्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्यांना उडी घेवून आत्महत्या केली.

अनैतिक संबंधातून उचलले टोकाचे पाऊल
मयत जितेंद्र जाधवचे वडील यांनी दिलेल्या फिर्यादीत मयताची पत्नी पूजा जितेंद्र जाधव, ईश्वर जिभाऊ जगताप (दोघे रा.बोरखेडा, ता.चाळीसगाव) आणि एक अनोळखी इसम यांनी जितेंद्रला मारहाण करत अपमानीत करत आत्महत्येस प्रवृत्त केले शिवाय आत्महत्या प्रकरणात पत्नीच्या अनैतिक संबंधाची किनार आली समोर आली आहे.