भुसावळ : भुसावळ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाख 54 हजारांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी कंटेनर क्लिनर महंमद अब्दुल हमीद (रा.हरीयाणा) यास अटक करण्यात आली होती तर अन्य संशयीत चालक पसार झाले होते. राजस्थानातून हा गुटखा राज्यात आल्याने पोलिसांच्या खोलवर तपासात देशभरातील गुटखा विक्री करणार्यांची साखळी उजेडात येण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर गुन्ह्याचा तपास सुरू केला असून त्यानंतर राजस्थान, कोटा आदी भागातून जावून आरोपींच्या मुसक्या बांधण्याचे नियोजन केले आहे.
नाशिक विभागातील सर्वात मोठी कारवाई
जळगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना गुटख्याची अवैध वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुषंगारे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांच्यासह पोलिसांनी सापळा रचून साकेगावजवळील सदगुरू पेट्रोल पंपावर तीन कंटेनरची तपासणी करून त्यातून सुमारे दोन कोटी 27 लाख 54 हजारांचा गुटखा जप्त केला. पोलिस पथकाला पाहताच संशयीत पसार झाले होते तर क्लिनर तौफिकला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीनंतर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोठी टोळी जाळ्यात अडकणार
या प्रकरणात मूळ मालक व अन्य गाड्यांवरील चालक व क्लिनर यांच्या शोधासाठी तालुका पोलिसांचे पथक हरीयाणा, दिल्ली परीरात जाणार आहे. संबंधित मालक व गाडीवरील अन्य चालक, क्लिनर याीें नावे कळाली आहे, लवकरच त्यांचा अटक केली जाणार आहे. पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या शोधासाठी हरीयाणा राज्यात रवाना होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी दिली.