जळगाव : शहरातील तांबापुरा येथील बिलाल चौकात एका तरुणीला शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाविरोधात गुन्हा
सुप्रीम कॉलनीतल्या रामदेव बाबा मंदिरजवळ राहणारी 18 वर्षाची तरुणी ही रविवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता शहरातील तरुणी तांबापुर येथील बिलाल चौकात असणार्या आपल्या मावशीच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने पुरुषाचा ड्रेस शर्ट आणि पँट परीधान केला होता. तरुणीला मुलगा समजून संशयीत आरोपी वसीम घंटे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. तंबापुरा, बिलाल चौक, जळगाव याने दुकानातून कोल्ड्रिंक्स आणून दे असे सांगितले. त्यावर तिने नकार दिला. याचा राग आल्याने संशयीत आरोपी वसीम घंटे याने तरुणीला शिवीगाळ केली. शिवीगाळ करत असताना तिची मावशी समजविण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांनादेखील गालावर चापट मारून शिवीगाळ करण्यात आली.