यावल : यावल शेत शिवारातील टेंभीकुरण भागातील शेताततून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीची केबल वायर लांबवली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती साहित्याच्या चोरीने शेतकर्यांमध्ये घबराट
शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी देविदास शंकर सूर्यवंशी यांनी यावल शेत-शिवारात टेंभीकुरण भागात शेत गट क्रमांक 2508 हे बटाईने केले आहे. या शेतात केळी लावली असून केळीला कुपनलिकेव्दारे पाणीपुरवठा ते करतात तर रविवारी या कुपनलिकेची केबल वायर थ्रीफेस पट्टा केबल 30 फुट लांबी व कॉपर कंडक्टर चार एमएम चोरट्यांनी लांबवले. सहा हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.