जळगावात सुप्रीम कंपनीतील कर्मचार्‍याचा निर्घृण खून : दोन आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव : मेहरुण तलावाच्या काठावर जळगावातील रहिवासी व सुप्रीम कंपनीतील कर्मचारी दिनेश भिकन पाटील (45, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब शनिवार, 9 एप्रिल 2022 रोजी उघडकीस आली होती. तब्बल आठवडाभरानंतर जळगाव गुन्हे शाखेला खुनाचा उलगडा करण्यात यश आले आहे. या प्रकरणी दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

दगडाने ठेचून केली होती हत्या
मेहरुण तलावाच्या काठावर एका प्रौढाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्‍यांनी धाव घेतली होती व सुरुवातीला मयत 45 वर्षीय अनोळखी होता मात्र काही तासातच पोलिसांना ओळख पटवण्यात यश आले हेते. मृत दिनेश भिकन पाटील (45, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी ? असा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता.

जळगाव गुन्हे शाखेने केली गुन्ह्याची उकल
एमआयडीसी पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. तांत्रि बाबींच्या विश्लेषणासह चौहो बाजूंनी यंत्रणेने तपास केल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. संशयीतांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यातील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे. खुनाचा गुन्हा किरकोळ वादातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयीत व मयतांमध्ये मेहरुण तलावाकाठी किरकोळ कारणावरून वाद झाला व त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते.