दीनदुबळ्यांची भीमराया झालास तू सावली…!

भुसावळ विभागात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन : विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ : भुसावळ शहर व परीसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बोदवड शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने नागरीकांचे लक्ष वेधले तर भुसावळातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी दिवसभर गर्दी उसळली होती. अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धत्तीने ठिकठिकणी मिरवणुका काढण्यात आल्या.

दीपनगर, ता.भुसावळ
दीपनगर : दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नवीन क्रीडा भवनात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता विजय राठोड यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.पुणे येथील जनता अगेंस्ट करप्शन उपक्रमाचे जिल्हा उपप्रभारी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विक्रांत शेळके, 660 वीजनिर्मिती प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता महेश महाजन, मुख्य औद्योगिक संबंध कामगार कल्याण अधिकारी मुकेश मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शुक्रवार, 16 रोजी ख्यातनाम कवी अनंत राऊत यांच्या उपस्थितीत कवी संमेलन झाले. जयंती उत्सव समितीचे सचिव रोशन वाघ, सहसचिव सुभाष मेश्राम, रोहन काकडे, छगन पवार, मोहित कांबळे, गणेश राठोड, मनोहर बार्‍हे आदींनी परीश्रम घेतले.

कुर्‍हाकाकोडा येथे स्टम्पर बॉलचे खुले सामने
मुक्ताईनगर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्‍हाकाकोडा येथे शिवशक्ती क्रिकेट क्लबतर्फे स्टम्पर बॉल खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सामन्याचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार हार अर्पण करून व क्रिकेट खेळून पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निखील भोलानकर, ज्ञानेश्वर ढोले, चंद्रकांत कोल्हे, रामेश्वर ढोले, मुरलिधर आगरकर, योगेश भोंडेकर, बाळू गुरव, गजानन गुरव, तुषार सपकाळे, सुरज कांडेलकर, भावेश कांडेलकर, भारत कांडेलकर, आदित्य कुंवर, यश चोपडे व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

बोदवडला मिरवणुकीने वेधले लक्ष
बोदवड : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्त्ति सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बोदवड शहर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक साकला कॉलनी येथील तक्षशीला बुद्ध विहारापासून काढण्यात आली. पुतळ्याजवळ जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज तायडे, उपाध्यक्ष सुनीता पालवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. बोदवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, माजी सभापती किशोर गायकवाड, नगरसेवक भरत अप्पा पाटील, गोपाल गंगतीरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाचे उपस्थित होते.

सावदा, ता.रावेर
सावदा : शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपालिकेत प्रशासक व प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक, पालिका कर्मचारी आदी उपस्थित होते. बस स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासदेखील प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरपालिका कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध पक्षाचे पदाधिकारी, व नागरीक उपस्थित होते. सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरापासून सजवलेल्या ट्रॅक्टरवर देखावेे सादर करून मिरवणूक काढण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे समस्त बौद्ध युवक ट्रस्टला देण्यात येत असलेल्या पाण्याचा टँकरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदारांतर्फे तुषार बोरसे, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, सुरज परदेशी, धनंजय चौधरी, सिद्धार्थ बडगे, नंदाबाई लोखंडे, नीरज सोनवणे, छोटू कोळी, समस्त बौद्ध युवक ट्रस्टचे सदस्य व नागरीक उपस्थित होते.

फैजपूर, ता.यावल
फैजपूर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, प्रशासकिय, सामाजिक, राजकीय व खासगी संस्थेत जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातून मिरवणूक, मोटारसायकल रॅली यांसह मान्यवरांकडून उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, आमदार शिरीष चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर उपाध्यक्ष मनोज अडकमोल यांच्यातर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा महानंदा होले, माजी उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, हेमराज चौधरी, सुनील शेठ वाढे, प्रा.उमाकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, उपनिरीक्षक शेख मकसुद, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, समाजसेवक इरफान शेख, रईस मोमीन, जलील शेख, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, माजी नगरसेवक डॉ.इम्रान शेख, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, दिव्यांग सेनेचे नानाभाई मोची यांच्यासह मान्यवरांनी माल्यार्पण केले. यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक हिवरे, उपाध्यक्ष सागर भालेराव, सचिव रॉक मेढे, खजिनदार रोहित मेढे, कार्याध्यक्ष शेख जहांगीर, सल्लागार मयूर मेढे, सदस्य उदय तायडे, बौद्ध पंच ट्रस्ट अध्यक्ष भीमराव मेढे, संतोष मेढे, विजय मेढे, भालचंद्र मेढे, अमर मेढे, पप्पू मेढे, सुमित साळुंके, अजय मेढे, भूषण मेढे, मुन्ना मेढे, योगीराज मेढे, राजू वाघ, चेतन मेढे, रितेश मेढे, अनिल मेढे, चंद्रगुप्त मेढे, नीरज मेढे, अमोल मेढे, बंटी मेढे, धीरज मेढे यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.