जळगावातून चोरट्यांनी चारचाकी लांबवली

जळगाव : शहरातील ऑटो नगरातून 75 हजार रुपये किंमतीची चारचाकी चोरट्यांनी लांबवली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहनांच्या चोर्‍या वाढल्या
लक्ष्मीकांत बाळकृष्ण फटांगडे (69, अयोध्यानगर, जळगाव) यांनी रविवार, 10 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता त्यांची कार क्रमांक (एम.एच.19 ए.पी.880) ऑटोनगर येथील हिंदुस्तान इंजिनिअरींग वेल्डिंगच्या दुकानासमोर पार्क केली मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 75 हजार रुपये किंमतीची कार चोरून नेल्याचे सोमवार, 11 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीला आले. रविवार, 17 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.