सलूनसह पार्लरच्या दरात वाढ : नवी दरवाढ राज्यात 1 मे पासून लागू होणार

मुंबई : सलून व ब्युटीपार्लरमध्ये जाणे ग्राहकांसाठी आता अधिक खर्चिक ठरणार आहे. पेट्रोल डिझेल असो, दैनंदिन लागणार्‍या वस्तू व किराणा मालाचे भाव असो की भाजीपाला असो अशा सर्वांची चांगलीच दरवाढ झाल्यानंतर आता राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी दरवाढ करण्याच्या निर्णयाला सहमती दिल्याने व्यावसायीकांना दिलासा दिला आहे.

केस कापणे झाले महाग
सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायीकांनी दरवाढ केली आह त्यामुळे आता दाढी करणे आणि केस कापणे महागणार आहे. तर ब्यूटी पार्लरमध्ये जाणार्‍या महिलांनादेखील दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

30 टक्के दरवाढीचा निर्णय
राज्यातील सलून तसेच ब्युटी पार्लर व्यावसायिक यांनी ऑनलाईन बैठकीत दरवाढीचा निर्णय घेत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 30 टक्के दरवाढीचा निर्णय घेतला आहे. 1 मे (कामगार दिन) पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान नागरीकांनी सुद्धा या होणार्‍या दरवाढीला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशीद यांच्याकडून करण्यात आले आहे.

52 हजार सदस्य
राज्यातून अनेक दिवसांपासून दरवाढ करण्यासाठी व्यावसायिकांची मागणी होत होती असोसिएशनचे जवळपास 52,000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. अशी माहिती सलून अँड ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे

दरवाढीचे कारणे काय?
1) ब्युटी प्रॉडक्ट/पेट्रोल/गॅस सिलेंडर/खाद्यतेल/शाळांची फी यांसह इतर दरवाढ

2) कोरोना काळातील स्थिती व लॉकडाऊननंतर अंदाजे 50% कमी झालेले ग्राहक आणि वाढती बेरोजगारी

3) सरकारचे नाभिक समाज व सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरू असलेले दुर्लक्ष