एरंडोल : 34 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घअना जहांगीरपुरा भागात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. रुपाली विश्वनाथ पाटील (34) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
पंख्याला साडीने घेतला गळफास
रुपाली पाटील या विवाहितेने घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, 23 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत मयत पती विश्वनाथ पाटील यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पती बाहेरगावी असताना विवाहितेची आत्महत्या
मयत विवाहितेचा पती हा विश्वनाथ पाटील हा माल वाहतूक करणारी रीक्षा चालवून तसेच व शेती करून उदरनिर्वाळ करतो. मयत रूपाली या ब्युटी पार्लर व शिवणकाम करीत होते. शनिवारी विश्वनाथ हा त्याची मालवाहतूक रिक्षा घेऊन रिंगणगाव येथून परतत असताना विखरण गावाजवळ आला असता त्याला फोनवरून त्याच्या घराजवळ लोकांची गर्दी जमल्याचे सांगण्यात आले. तो घरी पोहोचल्यावर त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. मयत विवाहितेच्या पश्चात मुलगा, मुलगी व पती असा परीवार आहे. दरम्यान, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.