चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून देण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील ऋषीकेश सुरेश पावले याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी ऋषीकेश पावले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण हे करीत आहे.