जळगाव : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या तरुणीवर तब्बल आठ वर्षांपासून अत्याचार करण्यात आला शिवाय ब्लॅकमेलही करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भुसावळातील काही संशयीतांना मंगळवारी रात्री उशिरा जळगाव शहर पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
आठ वर्षांपासून तरुणीवर अत्याचार
पीडीतेच्या तक्रारीनुसार गेल्या आठ वर्षांपासून ते आजअखेर वेळोवेळी रीतेश सुनील बाविस्कर (रा.खळवाडी, जुना सातारा, भुसावळ) याने तरुणी ही सातवीत असताना तरुणी (14 वर्षांची) तिच्यासह मैत्रिणींचे शाळेत केव्हातरी फोटो काढून, ते समाजात व शाळेत व्हायरल करेल, अशी धमकी दिली व पीडीतेला दुचाकीवरून बसवून भुसावळातील इंजिनघाट परीसरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. संशयीत बंटी (पूर्ण नाव माहित नाही रा.भुसावळ) व राहुल (पूर्ण नाव माहित नाही रा.भुसावळ) यांनीदेखील अत्याचार केल्याचा आरोप आहे तर तरुणीच्या उजव्या हातातील बोटातील सोन्याची अंगठी व 200 रुपये तसेच डाव्या हातातील बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली तसेच दोन संशयीत महिला (रा.टिटवाळा, मुंबई) यांनी तरुणीस तु तुझ्या घरातून पैसे चोरून आण नाहीतर तुझे फोटो व्हायरल करू, अशी धमकी दिली तर संशयीत उर्वेश पाटील (रा. भुसावळ) याने संशयीत शोभा बाविस्कर हिच्या लग्नासाठी 50 ते 60 हजारांची मागणी केली. पीडित तरुणीने घाबरून 50 हजार रुपये त्यांना दिले. रीतेश सुनील बाविस्कर याने तरुणीसोबत वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापीत केले शिवाय तरुणीची ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
22 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार सन 2014 ते 19 एप्रिल 2022 दरम्यान तिच्यावर संशयीताने वारंवार अत्याचार केला तर अन्य आरोपींनी ब्लॅकमेल करीत पैसे उकळल्याने त्यांच्याविरोधात सोमवारी रात्री 11.58 वाजता गुन्हा दाखल करण्यात आाल. संशयीत आरोपी रीतेश सुनील बाविस्कर (खळवाडी, जुना सातारा, भुसावळ), शोभा सुनील बाविस्कर, नंदिनी राहुल कोळी (टिटवाळा, मुंबई), सुनील बाविस्कर (खळवाडी, जुना सातारा, भुसावळ), उर्वेश पाटील (भुसावळ), बंटी व राहुल (पूर्ण नाव नाही, रा.भुसावळ) यांच्याविरोधात भादंवि 376 (एन.), 392, 354 (ए.), 506, 34, पोस्को कायदा सन 2012 चे कलम 4, 5 (एल), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहेत.