अमळनेर : पाय घसरून विहिरीत पडल्याने 43 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बारकू चंद्र भील (43, कलाली, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे.
पाय घसरून पडल्याने मृत्यू
बारकू चंद्र भील हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला असून बुधवार, 27 एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले असता गावाच्या बाहेर असलेल्या एका विहिरीत पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. ही बाब सोबत असलेल्या सहकार्यांच्या लक्षात आल्याने परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली व त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढत अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार विशाल चव्हाण करीत आहे.