भडगाव शहरात अपघात : पहुरच्या प्रौढाचा मृत्यू

भडगाव : रस्त्यावर उभ्या असलेल्या पहुरच्या पादचार्‍याने भरधाव ट्रॅक्टरने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 21 रोजी घडली होती. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रस्त्यावर प्रौढ उभे असताना ट्रॅक्टरची धडक
जामनेर तालुक्यातील पहूर येथील विलास बाबूलाल चौधरी (45) हे कामानिमित्ताने भडगाव शहरातील पाचोरा चौकात गुरुवार, 21 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता आले असता रस्त्यावर वाहनाची वाट पाहत असतांना त्यावेळी भरधाव ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.20 सी.टी. 8098) ने जोरदार धडक दिल्याने विलास चौधरी हे जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी मयताची पत्नी विजया विलास चौधरी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय जाधव करीत आहे.