धुळे : रमजान ईद, अक्षयतृतीय आदी सण-उत्सवाच्या काळात सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या उपद्रवींना शहराबाहेर ठेवण्याचे पोलिस प्रशासनाने नियोजन केले होते. त्या अनुषंगाने 12 उपद्रवींना 1 ते 5 मे दरम्यान धुळे शहरात येण्यास मनाई करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकार्यांनी काढले आहेत. या आदेशाने उपद्रवींच्या गोटात खळबळ उडाली आहे.
या संशयीतांना पाच दिवस धुळे शहरात बंदी
योगेश हनुमंत भोकरे, राजेंद्र कचरु मराठे उर्फ राजु महाराज, संजय रामेश्वर शर्मा, मुश्ताक शहा गुलाब शहा, शरीफ शहा गुलाब शहा, शरीफ शहा भोलु शहा, समीर अन्सारी मोहम्मद सुभान, साजीद हैदर शहा, परशुराम रघुवीर परदेशी, मोहम्मद सादीक मोहम्मद सलीम, धीरज रामेश्वर परदेशी व वसीम सलीम रंगरेज उर्फ वसीम वड्या यांना 1 ते 5 मे दरम्यान धुळे शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. धुळे शहर, आझादनगर व चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याकडून उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर त्यावर उपविभागीय दंडाधिकार्यांनी निर्णय घेत आदेश काढल्यानंतर उपद्रवींच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.