फैजपूर नगरपरीषद क्षेत्रातील विकास कामांसाठी तीन कोटी 30 लाखांचा निधी

आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांना यश : विविध विकासकामे होणार

फैजपूर : फैजपूर नगरपरीषद क्षेत्रातील विकास कामांसाठी विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी लेखाशिर्ष (3054 0022) नुसार आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी तीन कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांमुळे मिळणार दिलासा
या निधीतून म्युन्सीपल हायस्कूलच्या दुसर्‍या मजल्यावर स्लँबला ब्रिकवँट व वॉटर प्रुफींग करणे, यावल रोडवरील भारत एंटरप्राईज पासून जानकी नगरपर्यंत सर्व रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे, आशिष सराफ नगरात खडीकरण करणे, खिरोदा रोडपासून सतपंथ समाज वैकुंठ धामपर्यंत रस्ता खडीकरण करणे, यावल रोडवरील अँग्री मार्टपासून ते हंबर्डी रस्त्यापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे, आसाराम नगरातील किशोर वाघुळदे यांच्या घरापासून ते संजय चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, आसाराम नगरातील किशोर पाटील यांच्या घरापासून ते मिरची ग्राऊंड ते निळू सराफ यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, लक्ष्मी नगर पाण्याच्या टाकी परीसरातील रस्ते डांबरीकरण करणे, लक्ष्मी नगरातील किरण भिरूड ते खंडेराव वाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे, सुन्नी मज्जिदपासून अमतमद चॅरीटी हॉस्पिटल ते कळमोदा रोड खडीकरण व काँक्रिटीकरण करणे, मिरल्लत नगरात जमील डायनामा यांच्या घरापासून ते गयास लसूनवाले यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे, मिल्लत नगरात फातिमा ऊउर्दू स्कूलपासून विस्डम इंग्लिश स्कूल गट नं.503 पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण करणे, ताहानगरात मस्जिद खलील परीसरात खडीकरण व काँक्रिटीकरण, आराधना कॉलनीत रमेश जोगी यांच्या घरापासून ते अनिल गुळवे यांच्या घरापर्यंत ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, इस्लामपुरा भागात अब्दुल रहेमान अंतुले यांच्या घरापासून ते कालू सरदार यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे असा एकूण 3.30 कोटी रुपयांचा निधी फैजपूर नगरपरीषदेला विकास कामांसाठी ‘षविशेष रस्ता अनुदान’ योजनेंतर्गत मंजूर झालेला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल, अशी माहिती खिरोदा आमदार कार्यालयाकडून देण्यात आली.