भडगाव : दहावीतील बालिकेला दुचाकीवरून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार
भडगाव तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पीडीता 21 मार्च रोजी दहावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर हिंदीचा पेपर सुटताच गावातील संशयीत आरोपी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी (पूर्ण नाव माहित नाही) यांनी पीडीतेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका लॉजवर नेत तिथे तिच्यावर कृष्णा चौधरी याने अत्याचार केला. या अत्याचाराचे फोटो संशयीने बंटी याने काढले व नंतर ते फोटो व्हायरल केल्याचेही समोर आले.
भडगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
अत्याचार झाल्याची घटना पीडीतेने घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. संशयीत आरोपी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.