जळगावात दुचाकी चोरींचे सत्र कायम  साईनगरातील दुचाकी चोरीला

जळगाव : शहरात दुचाकी चोरींचे सत्र थांबायला तयार नाही. शहरातील साईनगरातून चोरट्यांनी पुन्हा दुचाकी लांबवल्याची बाब समोर आली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
गिरीष नवल पाटील (30) हे साईनगरात वास्तव्यास आहेत. गिरीश पाटील यांनी सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.एल. 0214) घरासमोर उभी केली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर गिरीश पाटील यांनी मंगळवारी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अनिल तायडे करीत आहेत.