चाळीसगाव : तालुक्यातील सांगवी येथे एका ऊसतोड मजुराच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीत रोकडसह तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.
गॅस गळतीनंतर पेटले सिलिंडर
चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील दामु फंदू राठोड हा ऊसतोड मजूर असून त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतो. राठोड हा नुकतीच ऊसतोडणी वरून घरी परतला असून त्यांच्या पत्नी बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. यावेळी घरातील संसारोपयोगी वस्तूंसह 5 ग्रॅम सोने, बाजरीचे धान्य, बैलांची विक्री करून कपाटात ठेवलेले एक लाख रुपये जळून खाक झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शेजारील धनंजय ठाकरे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.