जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांनी डेरा जमवल्यानंतर आता ग्रामीण भागातही दुचाकी चोरींचे सत्र सुरू केल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी लांबवली दुचाकी
जितेंद्र ममतू राठोड (27, रामदेव वाडी, ता.जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 10 मे रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.एक्स. 6179) पार्क केली असता चोरट्यांनी संधी साधली. एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मिलिंद सोनवणे करीत आहेत.