जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या तीन दांडी बहाद्दर कर्मचार्यांना नूतन आयुक्तांनी निलंबीत केल्याने कर्मचार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे तर 41 कर्मचार्यांना कारणे दाखवे नोटीस बजावण्यात आली आहे. निलंबीत झालेल्यांमध्ये मलेरीया विभागातील आरोग्य पर्यवेक्षक व दोन मंजुरांचा सामावेश आहे.
कारवाईने दांडी बहाद्दरांच्या गोटात खळबळ
महापालिकेच्या नवीन आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दांडी बहाद्दर कर्मचार्यांवर अंकुश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. शिस्तीसाठी अचानक कर्मचार्यांचे हजेरीबुक मागविण्यात येत आहे. दिवसातून केव्हाही दोन वेळेस हजेरीबुक ताब्यात घेण्यात येत असून ड्युटीवर असताना गायब झालेल्या कर्मचार्यांना नोटीसा दिल्या जात आहेत.
तिघांच्या निलंबनाने खळबळ
पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर बसून उशिरा येणार्या चांगलीच हजेरी घेतली तर बुधवारी डॉ.विद्या गायकवाड यांनी अचानक पहाटे सहा वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मलेरीया विभाग, पाणीपुरवठा युनिट व बांधकाम युनिटला भेट देवून तेथील कर्मचार्यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान हजेरी मस्टरवर तफावत आढळून आल्या असून काही लोक हजेरी लावलेली असतांना गायब होते. तसेच काही लोकांकडून आपली जबाबदारी पार पाडली जात नसल्यामुळे मलेरीया विभागातील तीन जणांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये मलेरिया विभागातील आरोग्य पर्यवेक्षक व दोन मंजुरांचा सामावेश आहे. तसेच मलेरिया विभाग प्रमुख यांचे आपल्या विभागातील कर्मचार्यांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून इतर विविध विभागातील 41 कर्मचार्यांना देखील नोटीस बजाविण्यात आल्याचे समजते.