कर्की फाट्यावर बस उलटली : वाहक जागीच ठार

मुक्ताईनगर : मध्यप्रदेश आगाराच्या उज्जैन-शेगाव बसला मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्यावर अपघात झाल्याने वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर 15 प्रवासी जखमी झाले. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक रवाना झाले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. विनोद चिंतामण गुजर (35, मोडिया, तहसील मालवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे.

शेतात उलटली बस
मध्यप्रदेशातील उज्जैन येवून शेगावला जाणारी मध्यप्रदेश परीवहन मंडळाची बस क्रमांक (एम.पी.13 पी.1343) ही गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळून जात असतांना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलट्या दिशेने मागे जात थेट शेतात जावून उलटली. यात अपघातात वाहक हा जागीच ठार झाला तर 15 प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुणालयात उपचारार्थ हलवण्यात आले. मुक्ताईनगर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.