अँगल चोरी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

भुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून लोखंडी अँगल चोरण्याच्या प्रयत्नातील तिघांना सुरक्षा रक्षकाने हटकताच तिघांनी धूम ठोकली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये मेसर्स बीएनसी पॉवर कंपनीच्या मालकीचे टॉवर तयार करण्याचे काम सुरू असून लोखंडी अँगल चोरट्याने चोरले. 14 हजार 600 रुपयांचा हा मुद्देमाल चोरून दुचाकी (एम.एच.19 डी.ए.3363) वरून मुद्देमाल नेला जात असताना मेस्को सुरक्षा रक्षक अरविंद सुधाकर भोळे (रा. गोकुळ नगर, भुसावळ) यांनी गाडी अडवली तर यावेळी संशयीत पसार झाले. भोळे यांच्या फिर्यादीनुसार चेतन उर्फ विशाल लहू वानखेडे याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांनी भेट दिली. हवालदार प्रेमचंद सपकाळे पुढील तपास करीत आहे.