दहिगावच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपी तरुणाला अटक

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील एका 25 वर्षीय तरुणाने फुस लावत पळवुन नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून पीडीतेला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी तरुणाला विशेष न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

आरोपी तरुणाला अटक
यावल तालुक्यातील दहिगाव येथून रविवार, 8 मे रोजी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच धीरज रतीलाल माळी (25) या तरुणाने फसू लावून पळवून नेले होते. या प्रकरणी पीडीतेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा यावल पोलिसात दाखल करण्यात आला. मंगळवारी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पीडीतेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्ह्यात अपहरणासह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण कायदा पोस्को अन्वये लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले तर संशयीत धीरज यास बुधवारी जळगाव जिल्हा विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.