फैजपूर : शहरातील प्रांताधिकारी कार्यालयावर बुधवारी रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व रीपाइं अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांसह गोरगरीबांच्या समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष यावेळी वेधण्यात आले.
या मागण्यांसाठी आंदोलन
फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर रीपाइंने नगरपरीषद दवाखान्यात कायमस्वरुपी डॉक्टर देण्यात यावेत, विधवा महिलांना त्वरीत पेन्शन लागू करावी, नगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण नियमाकुल करावे, फैजपूरातील शिव कॉलनीतील माता रमाबाई आंबेडकर उद्यानात सुशोभीकरण करावे आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. आंदोलनचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी रीपाइंचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष अशोक बोरेकर, यावल तालुकाध्यक्ष अरुण गजरे, भीमराव गजरे, यावल शहराध्यक्ष विष्णू पारधे, राजू तडवी, लखन इंगळे, हिरामण पाटिल, महिला अध्यक्ष रजीया शकील खाटीक, महिला उपाध्यक्ष लताबाई मेढे, मेहमुदा नामदार तडवी, छाया प्रवीण मेढे, मनिषा समाधान शिदे, ज्योती प्रल्हाद वडर, सलिमा हरुण पिंजारी, कमलबाई शंकर वडर, शायदाबी शेख असलम, संगिता शंकर, सुनिता अशोक कु-हाडे, पुजा निलेश वडर, लक्ष्मी संजय वडर, रत्ना चंद्रकांत वडर, शालिनी मारुती शिंदे, अलकाबाई देवराम वडर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.