मालेगाव : अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नी व प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना तालुक्यातील टाकळी येथे उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित रोहिणी दीपक सूर्यवंशी (रा.टाकळी) व रवींद्र बुधा पवार (21, रा. तळवाडे) यांना अटक केली.
अनैतिक प्रेमसंबंधातून खून
रोहिणी हिचा विवाह टाकळी येथील दीपक हिरामण सूर्यवंशी (32) यांच्याशी झाला होता. बुधवार, 18 रोजी दीपक आपल्या राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मात्र पोलिसांना या घटनेचा संशय आल्याने अधिक चौकशी केली असता रोहिणी व तिच्या प्रियकराने हा खून केल्याचे स्पष्ट झाले. दीपकचा भाचा सागर कडू निकम (27, रा. टाकळी) याने फिर्याद दिली. त्यानंतर त्यांना दोघांना अटक करण्यात आली.