अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती : चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर तिच्यावर सतत साडेसहा महिने अत्याचार करण्यात आल्याने पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना चाळीसगावा तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्याचारातून पीडीता गर्भवती
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळविले. संशयीयताने तब्बल साडे सहा महिने अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवत अत्याचार केला. या प्रकारातून ती मुलगी गर्भवती झाल्याचा गंभीर प्रकार शनिवार, 21 मे रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आला. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बु. (मजरे) येथील रहिवासी असलेल्या भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे या संशयीत आरोपीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम- 376 (2) (एन), 363, 366 (ए), पोस्को अंतर्गत 4, 6, 8, 12 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.