पाचोरा तालुक्यातील महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

पाचोरा : तालुक्यातील एका गावातील 48 वर्षीय महिलेने लग्न करावे म्हणून तिला धमकी देण्यात आली तसेच मोबाईलवर मेसेज टाकून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एकाविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रावेरच्या संशयीताविरोधात गुन्हा
पाचोरा तालुक्यातील एका गावात 48 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. संशयीत आरोपी रवींद्र कल्लू पवार (रा.जुना सावदा रोड, श्रीराम कॉलनी, रावेर) याने महिलेच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज टाकले तसेच महिलेच्या घरी जावून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी रवींद्र कल्लू पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राहुल मोरे करीत आहे.